मध्य प्रदेशातील धारच्या सावकाराला लुटून आणलेले चोरीचे सुमारे १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोन्या-चांदीचे दागिने आरोपींनी शहरात विकले आहे. या प्रकरणी शहरातील दोघा सराफांची पोलिसांनी चौकशी केली. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
नाशिक येथील प्रभू भगवानसिंग या गुन्हेगाराने हे सोने विकले असून तो फरार आहे. त्याच्याविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली व सरकारवाडा पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मोटारसायकल चो-या, धूमस्टाईल सोन्याचे दागिने चोरण्यात तो पटाईत आहे. साठहून अधिक गुन्हे त्याच्याविरुद्ध नाशिकला दाखल आहेत. शहरातील काही गुन्हेगारांच्या मदतीने त्याने शहरातीलच एका मोठय़ा सराफाला सोने विकल्याचा संशय मध्य प्रदेश पोलिसांना आहे. काही सराफांकडे या संदर्भात चौकशी केली. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. प्रभू या आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, त्यानंतर चोरीचे सोने घेणा-या सराफाला ताब्यात घेतले जाईल, असे मध्य प्रदेशातील धार पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी सांगितले.
फेब्रुवारी महिन्यात मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील राजगड येथील सावकार जवाहर जैन यांना लुटण्यात आले. सोन्या चांदीचे दागिने गहाण ठेवून ते लोकांना कर्जाऊ रक्कम देतात. चार आरोपींनी त्यांना भर दिवसा बांधून लुटले. लुटीतील हे सोने सुमारे ५५ किलो चांदी व अर्धा किलो सोने शहरात आणून विकण्यात आले. सावकार जैन याच्या लुटप्रकरणी पोलिसांनी हंसराज शर्मा (रा. भुलेर, ता. सरदारपूर, जि. धार) यास व त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे. या दोघांनी नाशिक येथील प्रभू भगवानसिंग नावाच्या आरोपींमार्फत हे सोने शहरात विकले होते. मध्य प्रदेशातील धार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक के. आर. पाटील, गोपाल सोलंकी यांच्या नेतृत्वाखालील पथक गुन्ह्याचा तपास करीत आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
95 percent ofh maayutis seat allotment problem was solved says girish mahajan
“महायुतीतील जागा वाटपाचा तिढा ९५ टक्के सुटला, पण…” गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य