News Flash

जळगावमध्ये कार अपघातात चार ठार

राष्ट्रीय महामार्गावर नशिराबादजवळ बुधवारी रात्री उशिरा काझी पेट्रोल पंपाजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कारने समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली.

संग्रहित छायाचित्र

जळगावमधील नशिराबादजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पाच जण या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर नशिराबादजवळ बुधवारी रात्री उशिरा काझी पेट्रोल पंपाजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कारने समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की कारमधील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींमध्ये प्रिन्स अग्रवाल याचा समावेश आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 9:49 am

Web Title: jalgaon 4 dead in car accident near nasirabad on national highway
Next Stories
1 श्रद्धांजली : १०० वर्षांचे ट्रेकर डॉ वसंत देसाई यांचे देहावसान
2 लोकलमधल्या ‘त्या’ टवाळखोर स्टंटबाजांना शोधलं, पोलिसांनी घातल्या बेड्या
3 संजय किर्लोस्करांची भावांविरोधात कोर्टात धाव, ७५० कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा
Just Now!
X