News Flash

जयंत पाटील यांच्याकडून फडणवीसांची तुलना नीरोशी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी युती सरकारवर चौफेर टीका केली

राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाची वाट पाहात असल्याची टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्या तुलना रोमन राजा नीरोशी केली. मंगळवारी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी युती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
जयंत पाटील म्हणाले, राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत विषम परिस्थितीचा सामना करतो आहे. मात्र, राज्य सरकारला त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करतो आहोत. पण त्याकडेही सरकार लक्ष देण्यास तयार नाही. संपूर्ण रोम जळत असताना तत्कालिन राजा नीरोने केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. त्याप्रमाणे फडणवीस हे देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदेशांची वाट बघत असल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या चर्चेमध्ये राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारवर चौफेर टीका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 11:06 am

Web Title: jayant patil compares devendra fadnavis with roman emperor nero
Next Stories
1 ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप अटळ’
2 अमित शहांचे हेलिकॉप्टर ऐन वेळी दुसऱ्या हेलिपॅडवर!
3 रायगड जिल्हय़ात तीन नवीन मच्छीमार जेट्टींना मंजुरी
Just Now!
X