गणित म्हटले की अनेक विद्यार्थ्यांच्या कपाळावर आठ्या येतात. अनेकांचा नावडता विषय असलेला हाच गणित विषय मात्र आता गावातीलच नाही तर जगभरातील विद्यार्थ्यांना आवडू लागला आहे. याचे कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक प्रवीण बनकर. उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली नावाच्या छोटेखानी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या बनकर यांनी युट्युबवर गणित शिकवण्याच्या प्रकारांचे अफलातून सादरीकरण केले आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ७६  लाख अभ्यासकांनी त्याला भेट दिली आहे. तर दीड लाखाहून अधिकजण सातत्याने त्यांनी विकसित केलेल्या अध्ययन पध्दतीचा अवलंब करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या हजेरीचा टक्का घसरत असताना बनकर यांनी जगभरातील विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. बनकर यांच्या ४५० चित्रफितींनी नेटकर्‍यांच्या मनावर मोठा प्रभाव टाकला आहे. त्यामुळे युट्युबने त्याची दखल घेवून त्यांना ‘सिल्वर’ पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.

राज्य शासनाचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम बहुतांश शिक्षकांना अद्या समजलेला नाही. मात्र ज्यांना समजला अशा तंत्रस्नेही शिक्षकांनी काळाबरोबर झेप घेत अफलातून प्रयोग केले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रवीण किसनराव बनकर मागील १२ वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करतात. मागच्या वर्षी त्यांनी उस्मानाबाद येथील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये एक वर्ष तंत्रस्नेही विषय सहायक म्हणून काम केले. जिल्ह्यातील शिक्षकांनी युट्यूब चॅनलचा वापर शिक्षण आणि प्रशिक्षणात कसा करावा, याबाबत त्यांनी शिक्षकांना धडे दिले. गणित म्हणजे अवघड विषय असा अनेकांचा गैरसमज असतो. त्यांच्यासाठी बनकर यांनी ‘इ-जिनिअस’ नावाने युट्यूब चॅनल सुरू केले. त्यावर तब्बल ४५० चित्रफिती अपलोड केल्या.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

आपल्या या चॅनेलद्वारे त्यांनी पाचवीपासून सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षांतील गणित, बुध्दीमत्ता, भूमिती या विषयांसंदर्भातील प्रकरणे समजावून सांगितली आहेत. लसावि-मसावि, काम-काळ-वेग, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, वारंवारिता, आकृत्या, अवकाशीय संबोध, भूमिती मुलभूत संबोध अशा शेकडो प्रकरणांचा यात समावेश आहे. पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परिक्षा, आठवीची एनएमएमएस परिक्षा, दहावीतील महत्वाची प्रकरणे इथपासून पुढे एमपीएससी, युपीएससी परिक्षेला येणारी सर्व प्रकारची गणिते कशी सोडवावीत, याचे स्पष्टीकरण उदाहरणासह दिले आहे.

राज्यात होणार्‍या सर्व स्पर्धा परिक्षेतील गणिताच्या पेपरनंतर निकाल येण्यापूर्वी बनकर यांच्या इ-जिनिअस चॅनलवर उत्तरपत्रिका तयार असते. दररोज वेगवेगळ्या गणित प्रकरणांवर व्हिडीओ तयार करून मोबाईलद्वारे तो अपलोड करण्याचा छंद त्यांना जडला. आतापर्यंत बनकर यांच्या चॅनलचे दिड लाखांहून अधिक सबस्क्रायबर झाले आहेत. राज्यभरातील शालेय स्तरापासून स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी या चॅनलला भेट देवून अवघड समजला जाणारा गणित विषय सोपा करून घेवू लागले आहेत.