05 March 2021

News Flash

कोल्हापूर : काँग्रेसमधील नेतृत्त्वाच्या तीन पिढ्यांचा पक्षाला रामराम

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे वजनदार घराणे म्हणून यांच्याकडे पाहिले जाते

(छायाचित्र - डावीकडून राहुल आवाडे, प्रकाश आवाडे आणि कलाप्पा आवाडे)

माजी खासदार व माजी उद्योग राज्य मंत्री कलाप्पा आवाडे, त्यांचे सुपुत्र व कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष , माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि त्यांचे चिरंजीव व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रकाश आवाडे यांनी यंदाच्या विधानसभेत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे वजनदार घराणे म्हणून आवाडे कुटुंबाकडे पाहिले जाते. सुमारे पाच दशके त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा ठेवला होता. कलाप्पा आवाडे यांनी नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, दोन वेळा खासदार अशी पदे भूषवली आहेत. प्रकाश आवाडे हे चार वेळेस आमदार तर दोन वेळा मंत्रिपदावर होते. याशिवाय त्यांच्या पत्नी किशोरी आवाडे या इचलकरंजीच्या सर्वाधिक सात वर्षे नगराध्यक्ष होत्या.

गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे हे भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडून पराभूत झाले आहेत. यावेळी पुन्हा दोघांमध्ये लढत होणार असली तरी काँग्रेसला वातावरण पूरक नसल्याने आवाडे अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.

चार दिवसांपूर्वी , कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या भवनात बांधण्यात आलेल्या भव्य सभागृहाचे उदघाटन लोकसभेतील काँग्रेसचे माजी गट नेते, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकाजुर्न खर्गे यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षस्तेखाली झाला होता. यावेळी आवाडे यांनी काँग्रेसची उमेदवारी यादी लवकर जाहीर करण्याची मागणी केली होती, पण अखेरीस आवाडे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 1:21 pm

Web Title: kolhapur congress leaders from awade family exits from party sas 89
Next Stories
1 मुंबईहून कोकणाकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद
2 महाजनादेश यात्रेच्या समारोपाला येणार नरेंद्र मोदी
3 रायगड: महाड-नागोठण्यात पूरस्थिती, ताम्हणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
Just Now!
X