kokan-jatraचत्र महिन्यात कोकणातील गावागावात वार्षकि जत्रा भरतात. या जत्रांमध्ये गळ टोचणी आणि निवडुंग झोडणी यासारखे अघोरी प्रकार परंपरा आणि रूढीच्या नावाने आजही सुरू आहेत.

कोकणात सध्या चत्रोत्सवाची धूम आहे. अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा येथील बहिरीदेव त्यापकीच एक. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी बहिरीदेवाची जत्रा भरते. या जत्रेत अंगावर काटा आणणारा प्रकार पाहायला मिळतो. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक निवडुंगांच्या काटय़ावर उघडय़ा अंगाने कोलांटउडय़ा मारतात किंवा निवडुंगाच्या झाडाने पाठीवर मारून घेतात. त्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या निवडुंगाला स्थानिक भाषेत पेरकूट म्हणतात. गावातील आणि परिसरातील भाविक देवाला नवस बोलतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी जत्रेच्या मिरवणुकीत या निवडुंगाचे फटकारे अंगावर मारून घेतात. यामुळे अंगावर होणाऱ्या जखमांचा भाविकांना काहीही त्रास होत नसल्याचा दावा केला जातो. भाविकांच्या जखमांवर गुलाल उधळला जातो. रोहा तालुक्यातील भातसई येथे आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरमध्ये मनोकामना पूर्ण होणारे भाविक पाठीत गळ टोचून घेतात. यानंतर लाकडाच्या लाटेवर लटकावून त्यांना फिरवले जाते. पाठीत गळ टोचून त्रास होत नाही असा दावा हे गळ टोचून घेणारे भाविक करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी गळटोचणीसाठी मानकरी मोठय़ा उत्साहाने तयार असतात.

पेण तालुक्यातील वढाव येथे निवडुंग अंगावर घेण्याची पंरपरा आहे. परंपरा आणि रूढीच्या नावाखाली शरीराला यातना देऊन देवापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग आजही अनेक लोक अवलंबतात.

या अघोरी प्रकारांना कुठलेही धार्मिक अधिष्ठान नाही. केवळ रूढी -परंपरांच्या नावाखाली हे प्रकार सुरू असतात. धर्मशास्त्र आणि पुराणात याला थारा नाही. लोकांनी हे प्रकार थांबवले पाहिजे. शरीराला यातना देऊन काही साध्य होणार नाही. देवाच्या नावाखाली मुक्या प्राण्यांचे बळी देण्याची प्रथा अलीकडच्या काळात वाढली आहे. हेदेखील चुकीचे आहे.

–  माधव केळकर, अध्यात्म आणि पुराण अभ्यासक तथा निरूपणकार