कोकण रेल्वेवर सावंतवाडीजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरुन घसरल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या मार्गावरील पूर्णपणे ठप्प झाली.

देशभरात रेल्वे अपघातांचे सत्र सुरुच असून गुरुवारी कोकण रेल्वेवर दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरुन घसरले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली आहे. सावंतवाडीजवळ नेमळे येथे इंजिन रुळावरुन घसरले. रेल्वे रुळाचे काम सुरु असताना हा अपघात झाला. यामध्ये रेल्वे रुळांखालील स्लिपरचे नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कोकण रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वाहतूक ठप्प झाल्याने कोकण रेल्वेवरील प्रवाशांचे हाल होत आहेत.