ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक रामचंद्र केळकर यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी आणि नातवंडे आहेत. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले.
त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी व फ्रेंच विषयांत एम. ए. केले तर अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात भाषाविज्ञान व मानववंश शास्त्रात पीएच. डी. प्राप्त केली. १९६२ ते १९६७ दरम्यान पुणे विद्यापीठात ते प्रपाठक होते. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात उपयोजित भाषाविज्ञानाचे अध्यापन त्यांनी केले. १९८९मध्ये ते सेवानिवृत्त झाले. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांमध्ये त्यांनी साहित्यसेवा केली असून ‘रुजुवात’ हे त्यांचे अखेरचे पुस्तक.
२००२मध्ये ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे वास्तव्य कन्या डॉ. रोशन रानडे यांच्याकडे होते.  
    

Former Pune Mayor Mohan Singh , Former Pune Mayor Mohan Singh Rajpal Passes Away, former pune mayor passed away, marathi news, pune news, pune former ncp mayor Mohan Singh,
माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन
physician Dr Ravindra Harshe passed away
सातारा: सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे यांचे निधन
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?