एक एप्रिल २०१९ रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड येथील पारंपरिक माच्छीमारांच्या मालवण येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात गरज पडली तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका उपस्थित मच्छीमारांनी घेतली होती. प्रशासनाच्या विरोधात व लोकप्रतिनिधींना माच्छीमारांच्या समस्यांची जाण व्हावी या दृष्टिकोनातून सदरची भूमिका घेण्यात आली.सदर मेळाव्यात एकजुटीने प्रशासन व राजकीय लोकप्रतिनिधींना बेकायदेशीर मासेमारी वर कारवाई व पारंपारिक माच्छीमारांच्या प्रश्नबाबत भूमिका स्पष्ट करण्या साठी पंधरा दिवसांचा अल्टीमेंटम देण्यात आला होता.त्यानुसार सत्ताधारी,विरोधक तसेच विविध पक्ष प्रतिनिधी यांनी अवैध मासेमारीवर कारवाई होण्याकामी प्रयत्न केले व यापुढे सुद्धा एलईडी पर्ससिन मासेमारी विरोधी लढ्यात सहभागी होऊन प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट जाहीर केले.त्यानुसार रायगड व रत्नागिरी येथील पारंपारिक मच्छीमार व त्यानंच्या प्रतिनिधींनी आपला लढा चालू ठेऊन तूर्त निवडणूक बहिष्काराची भूमिका मागे घेण्याचे सूतोवाच केले.

२० एप्रिल २०१९ रोजी मालवण येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या राज्यघटनेच्या कलमानुसार तूर्त बहिष्काराची भूमिका मागे घेऊन मच्छीमारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा पण समितीचा सदर निर्णय मच्छीमारा वर बंधनकारक नसेल असा निर्णय घेतला.माच्छीमारांच्या समस्या मार्गी लागण्याकामी जसे मच्छीमार जनसमुदायाच्या लढ्याची आवशक्यता असते त्याचप्रमाणे राजकीय लोकप्रतिनिधींच्या पाठिबा व सहकार्याची गरज असते.

सदर भूमिकेवर वेंगुर्ला, देवगड व मालवण येथील मच्छीमार प्रतिनिधींनी चर्चा करून समाज प्रबोधनासाठी कमी कालावधी राहिल्याने तूर्त निवडणुकीवरील बहिष्कार मागे घ्यावा व आपल्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरून मतदानाची भूमिका घ्यावी असे ठरले. परंतु ज्या मच्छीमाराना बहिष्कार टाकायचा असेल त्यांनी आपली बहिष्काराची भूमिका कायम ठेवावी असं ठरविण्यात आले.आगामी विधानसभा निवडणुकी पूर्वी एलईडी मासेमारी ची समस्या न सुटल्यास, रेडी ते विजयदुर्ग किनारपट्टीवरील मच्छीमारान मध्ये संघटित एकजुटी चे प्रबोधन घडवुन विधानसभा निवडणुकीवर संघटित पणे बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.तूर्त लोकसभा निवडणुकीच्या मातदानावरील बहिष्कार स्वेच्छेने मागे घेण्याचे आवाहन सदर प्रसिद्धी पत्रकाद्वारे करीत आहोत.