‘आपला मानूस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने सध्या अभिनेते नाना पाटेकर विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असणारे नाना विविध मुद्द्यांवर आपल्या प्रतिक्रिया देत असून काही विषयांवर अगदी खुलेपणाने आपली मतं मांडत आहेत. अशाच एका कार्यक्रमामध्ये गेले असता नानांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.

फडणवीस हा फारच चांगला माणूस आहे, असं नाना म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या फडणवीसांच्या कामाचं कौतुकही केलं. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जाणाऱ्या नानांना राजकारणाविषयीसुद्धा बरेच प्रश्न विचारण्याच येत आहेत. माध्यमांकडून विचारण्यात येणाऱ्या या प्रश्नांची नानासुद्धा मोठ्या शिताफीने उत्तरं देत आहेत.

‘राज माझा चित्रपट पाहणार नाही, असं होणार नाही’

सध्याच्या घडीला राज्यातील राजकारणावरही त्यांनी आपले मत मांडले. याविषयीच सांगताना ते म्हणाले, ‘सध्याच्या घडीला विरोधी पक्षनेते हे निवडणूकांवरच जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळेत ते विधानसभा आणि लोकसभेचे कामकाज सुरळीत चालू देत नाहीत. त्यामुळे निवडणूक संपल्यानंतर या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम करावे’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासोबतच त्यांनी बरीच वर्षे रेंगाळणाऱ्या सीमाप्रश्नाकडेही सर्वांचे लक्ष वेधले. हा सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.