News Flash

राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला

लोकलसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली होती बैठक

संग्रहित छायाचित्र

करोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून, राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवला आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला सातत्यानं मुदतवाढ दिली जात आहे. राज्य सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून, आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पूर्वीप्रमाणेच बंद असणार आहेत.

लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.

नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालील सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. 

सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
सामाजिक अंतर राखणं गरजेचं
सतत हात धुणे आवश्यक

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 12:35 pm

Web Title: maharashtra government extended lockdown till 28 feb no decission on local railway bmh 90
Next Stories
1 चुलत्यांमुळे लागली सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय – अजित पवार
2 “अर्णब, कंगनासारख्यांना सर्वोच्च न्यायालयात झटपट न्याय मिळतो, पण…”
3 जेजुरीच्या बाजारात हजार गाढवांची विक्री
Just Now!
X