अमरावती : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना फेसबुकच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. सुरज वडगावकर (३१, रा. अकोली रोड, साईनगर) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती देखील घेतली आहे.

आरोपी सुरज वडगावनकर याने जितेंद्र आव्हाड यांना गेल्या ९ एप्रिलला फेसबुकवरून जिवे मारण्याची धमकी दिली होती. आव्हाड यांचे स्वीय सहायक शंभूराजे प्रफुल्ल ढवळे ( रा. कर्निक नगर, सोलापूर) यांच्या ई-मेल तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे यांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
Why Arvind Kejriwal allowed to keep toffees with him in Tihar jail
डायबिटीस असलेल्या अरविंद केजरीवालांना जेलमध्ये का देणार चॉकलेट-गोळ्या? मधुमेहींना कसा होतो गोडाचा फायदा?

फेसबुकवर पोस्ट टाकल्याचा जाब विचारत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या कठीने काही लोकांनी मारहाण केल्याचा आरोप अनंत करमुसे या मुंबईतील व्यक्तीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात गेल्या ६ एप्रिलला दिलेल्या तक्रारीमध्ये केला होता. त्यानंतर राज्यात समाजमाध्यमांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आरोपी सूरज वडगावकर याने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ‘जितेंद्र आव्हाड यांचा दाभोलकर होणार, मॉर्निग वॉकला गेल्यानंतर संपवून टाकू’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.