05 April 2020

News Flash

मांडवी एक्सप्रेस बंद पडल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

माणगावच्या जवळ मांडवी एक्सप्रेस बंद पडली असून एक तासाहून अधिक वेळेपासून...

(संग्रहित छायाचित्र)

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मांडवी एक्सप्रेस बंद पडल्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. माणगावच्या जवळ इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मांडवी एक्सप्रेस बंद पडली होती.

एक तासाहून अधिक वेळेपासून ही एक्सप्रेस एकाच ठिकाणी सिंगल ट्रॅकवर उभी होती. याचा परिणाम कोकण रेल्वेच्या इतर गाड्यांवर झाला परिणामी कोकण रेल्वे विस्कळीत झाली. दरम्यान, जवळपास तासाभरानंतर नवं इंजिन लावून मांडवी एक्सप्रेस रवाना करण्यात आली आहे, त्यानंतर कोकण रेल्वेची सेवा आता पूर्वपदावर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2019 1:03 pm

Web Title: mandovi express konkan railway route affected
Next Stories
1 वडिलांचा सन्मान होईल तेथे जाऊ, दोन दिवसांत निर्णय – डॉ. विखे
2 ‘व्हिवा लाऊंज’मध्ये अभिनेत्री अमृता खानविलकरशी गप्पा..
3 दानवे-खोतकर यांची ‘चाय-पे-चर्चा’
Just Now!
X