News Flash

वसंतराव नाईक जयंती साजरी

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची १०२ वी जयंती महाराष्ट्र सदनातील सभागृहात साजरी करण्यात आली

| July 27, 2015 05:00 am

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची १०२ वी जयंती महाराष्ट्र सदनातील सभागृहात साजरी करण्यात आली. निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या वेळी गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेशचंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त माहिती व तंत्रज्ञान अविनाश कुमार, सहायक निवासी आयुक्त संजय आघाव, व्यवस्थापक यमुना जाधव यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र परिचय केंद्रातही साजरी करण्यात आली. या वेळी परिचय केंद्राचे उपसंचालक यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी माहिती अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यांसह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
श्री सर्वोत्तम अ. भा. मराठी कथा स्पर्धा
इंदौर मागील सहा वर्षांपासून श्री सर्वोत्तम आपल्या पहिल्या संपादक मंडळातील सदस्य बाळकाका ऊध्वरेषे यांच्या स्मृतीत अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धा आयोजित केली आहे, या वर्षी या स्पध्रेला नवीन वळण देत तीन कथानक जाहीर केले होते. श्री सर्वोत्तमचे संपादक अश्विन खरे यांनी सांगितले की, प्रत्येक कथानकाला प्रथम रोख रुपये १२०० व प्रमाणपत्र आणि दुसरा पुरस्कार रोख रुपये ७५० व प्रमाणपत्र आहे, या वर्षीचे निकाल पुढीलप्रमाणे- कथानक – १. तो नसता तर/ ती नसती तर प्रथम क्रमांक- कथा – पेशंट, कथाकार संदीप सरवटे, इंदौर. दुसरा पुरस्कार कथा – गोष्ट त्याची आणि तिची, कथाकार शुभदा साने, सांगली. कथानक २ -नाव नसलेले नाते -प्रथम क्रमांक कथा – बाहुली, कथाकार रेखा रखाबे, कोल्हापूर, दुसरा पुरस्कार कथा – अनाम.. -कथाकार मंगला नाफडे, नागपूर. कथानक ३. रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा प्रथम क्रमांक कथा – इथे तिथे मी तुझा सवे, कथाकार रोहिणी जोशी, इंदौर दुसरा पुरस्कार कथा – वारस, कथाकार माणिक भिसे, इंदूर. समीक्षक कथाकार जयश्री तराणेकर, समीक्षक डॉ महाशब्दे व कथा स्पर्धा संयोजिका कथाकार गीता सप्रे उपस्थित होते.
भारत गुणवर्धक संस्था
भारत गुणवर्धक संस्था (शाह अली बंडा) ही हैद्राबाद येथील १२० वर्षांची जुनी एकमेव मराठी संस्था आहे. भारत गुणवर्धक संस्थेचा स्थापना दिवस, मोठय़ा उत्साहाने संस्थेचे अध्यक्ष गोपालाचारी यांच्या मार्गदर्शनात साजरा झाला. प्रमुख पाहुणे विलास अफजलपूरकर (न्यायमूर्ती आंध्र प्रदेश, उच्च न्यायालय) आणि व्ही. गाडगीळ, हैदराबाद मेट्रोरेलचे प्रमुख हे दोन्ही मान्यवर उपस्थित होते. या समारंभामध्ये मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. भारत गुणवर्धक संस्थेचा वर्धापन दिन मराठी नव वर्षांची सुरुवात पंचांग वाचन करून करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर व्ही. गाडगीळ यांनी मेट्रोरेलच्या उपक्रमाची माहिती संस्थेच्या सभासदांना दिली. हैदराबाद मेट्रो रेलसारख्या मोठय़ा उपक्रमाची माहिती आपल्या संस्थेच्या सभासदांना आणि मराठी समाजातील इतरांना मिळावी, असे कार्यक्रम भारत गुणवर्धक संस्थेच्या कार्यकारिणीने आयोजित केले. त्याकरिता समस्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले. आभार संस्थेचे सचिव यज्ञेश्वर दीक्षित यांनी केले. अशा रीतीने वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे साजरा झाला.
महाराष्ट्र मंडळ :
मराठी समाजातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र मंडळाचे सहसचिव पराग वढावकर यांच्या संयोजनाने आणि कार्यवाह विवेक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरीत्या कार्यक्रम संपन्न झाला.
शंकर वाचनालय :
शंकर वाचनालय, शाह अली बंडा येथे पंचांग वाचनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला, असे संस्थेचे कार्यवाह यांनी सांगितले. भोपाळ येथील वार्षकि अधिवेशनात शंकर वाचनालय या संस्थेचा सत्कार करण्यात आला होता.

शाहू छत्रपती ग्रंथ प्रकाशन
(सत्येंद्र माईणकर)
महाराष्ट्र मंडळ, हैदराबाद व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजर्षी शाहू छत्रपती’ या ग्रंथाच्या तेलगू व उर्दू अनुवाद ग्रंथाचे रवेंद्र भारतीच्या भव्य सभागृहात प्रकाशन झाले. प्रकाशन समारंभासाठी कोल्हापूरहून ग्रंथाचे मूळ मराठी लेखक व डायरेक्टर, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी प्रा. डॉ. जयसिंगराव पवार त्यांच्या पत्नी व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूरचे अध्यक्ष श्रीपतराव िशदे आले होते. हिज हायनेस छत्रपती शाहू महाराज कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांचे आगमन होताच कार्यक्रमास सुरुवात झाली. व्यासपीठावर शाहू महाराजांसमवेत प्रा. डॉ. जयसिंग पवार, श्रीपतराव िशदे, डॉ. एल्लुरीशिवारेड्डी, जाहिदअली खान, डॉ. लक्ष्मी नारायण बोल्ली, हजरत सय्यद इफ्तिकार अहमद, श्रीनारायणराव देशपांडे, नीलातिम्मा राजू, विवेक देशपांडे इत्यादी विराजमान होते. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे आजोबा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. महाराष्ट्र मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष नारायणराव देशपांडे यांनी छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान केला. महाराष्ट्र मंडळाचे कार्यवाहक विवेक देशपांडे यांनी प्रास्ताविक सादर करीत सर्वाचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. जयसिंगराव पवार यांनी मूळ मराठी ग्रंथ राजर्षी शाहू छत्रपती यांचे १३ भागांत अनुवाद झाल्याची माहिती आपल्या भाषणातून दिली. कन्नड अनुवाद ग्रंथाचे प्रकाशन धारवाड विद्यापीठाचे कुलगुरूंच्या हस्ते झाले. इंग्रजी अनुवादाला भारताचे माननीय राष्ट्रपतींच्या शुभेच्छा लाभल्या. रशियन व जर्मन भाषांतही ग्रंथाचे अनुवाद झाले आहेत. सर्वप्रथम पोट्टी रामालू तेलगू विश्वविद्यालयाचे कुलगुरू यांनी ग्रंथाची माहिती दिली. सविस्तर माहिती तेलगू व डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी दिली. ए. जनार्दन यांनी केलेल्या सहायाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. त्यांनतर जाहिदअली खान यांनी ग्रंथाची थोडी माहिती दिली. सविस्तर माहिती उस्मानाबादचे उर्दू मराठीचे जाणकार हजरत सय्यद इफ्कार यांनी दिली. डॉ. जयसिंगराव पवार यांनी हैदराबादकरांचे विशेष आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 5:00 am

Web Title: marathi world 7
टॅग : Marathi
Next Stories
1 सांगलीत जळालेल्या बनावट नोटा
2 दलितही नक्षलवाद्यांचे लक्ष्य
3 अहमदनगरमधील बालगृहातून पाच मुलींचे पलायन
Just Now!
X