News Flash

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, पाच जखमी

नंडोलिया ऑरगॅनिक केमिकल्स या कंपनीमध्ये सायंकाळी सव्वासात वाजता झाला स्फोट

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या नंडोलिया ऑरगॅनिक केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला व पाच कामगार जखमी झाले आहेत.

सोलवेंट डिस्टिलेशन करणाऱ्या या कंपनीमध्ये रिऍक्टरमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर व किनारपट्टीची सर्व गावं हादरली व परिसरात मोठा कंप जाणवला. या स्फोटाचा आवाज १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर शहरात देखील प्रकर्षाने जाणवला. तसेच स्फोटानंतर निर्माण झालेली वायु दुर्गंधी देखील दुरवर  येत होती. रासायनिक प्रक्रियेदरम्यान औद्योगिक वसाहतीमधील टी-१४१ प्लॉटमध्ये हा स्फोट झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

स्फोटानंतर परिसरात वायु पसरल्याने तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाला शोध कार्य करण्यास अडथळे निर्माण झाले. या अपघाताच्या सुमारे एक तासानंतर व वायुचा प्रभाव कमी झाल्यानंतर तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाच्या जवानांनी बेपत्ता असलेल्या एका कामगाराचा मृतदेह शोधून काढला.

बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे तातडीने घटनास्थळी पोहोचले. या स्फोटाच्या वेळी कंपनीमध्ये १४ कामगार कामावर होते व त्यापैकी १३ जणांचा शोध लागला असून पाच जण जखमी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.  तर, या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव संदीप कुशवाह असून, जखमी झालेल्या कामगारांमध्ये मोहम्मद मोसिन अल्ताभ , दिलीप गुप्ता, उमेश कुशवाहा, संतोष कुमार सिंग, प्रमोद कुमार मिश्रा या पाच जणांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 7:41 pm

Web Title: massive explosion in tarapur industrial estate msr 87
Next Stories
1 कोल्हापूर : पंचगंगा नदी इशारा पातळीवर; अलमट्टीचा धोका टाळण्याचा प्रयत्न
2 राहुल गांधींची वक्तव्यं गांभीर्याने घेत नाही : देवेंद्र फडणवीस
3 आपल्याकडं किमयागार आहे, थोडा संयम ठेवा; मनसेचं कार्यकर्त्यांना आवाहन
Just Now!
X