माथेरान मध्ये येत्या २१ मे पासून पर्यटन महोत्सवाची धूम असणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून यावेळला पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. त्यामुळे या महोत्सवाला ग्रीन फेस्टीव्हल असे नाव देण्यात आले आहे. ११ देशांमधील कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करणार आहे.
माथेरान नगर परिषद, माथेरान प्रतिष्ठान आणि न्यू बॉम्बे डिझाईन ग्रिन फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या या महोत्सवात विविध सांस्कृतीक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत. स्थानिक कलाकारांबरोबरच राष्ट्रीय आणि ११ देशातील आंतरराष्ट्रीय कलाकार देखील कार्यक्रम सादर करणार आहेत.
कलेल्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा अभिनव उपक्रम हे या ग्रीन फेस्टीवलेचे वैशिष्ट्य असणार आहे. देशाच्या विवीध भागातून आलेले कलाकार टाकावू वस्तूपासून शिल्प तयार करणार आहेत. विविध निसर्गशिल्प या निमित्ताने माथेरानचे सौदर्य वाढविणार आहे.
निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात कामकरणारे जागतीक कीर्तीचे लोक या माथेरान ग्रिन महोत्सवात सहभागी होणार आहेत. टाकावू वास्तुपासून पुर्नरनिर्माण करून पर्यावरणाचे संतूनल कसे राखता येईल याची माहिती दिली जाणार आहे , असे कला दिग्दर्शक सुखांत पाणीग्रही यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सुमंत भांगे, दिग्दर्शक उज्ज्वल गावंड, माथेरान प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सावंत, माथेरानचे माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, संतोष पवार आदी यावेळी उपस्थित होते.