वसमत येथील आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या निवासस्थानातून विद्युत मीटरमधून बेकायदा वीजपुरवठा दिल्याने वीजवितरण कंपनीने त्यांना १४ हजार रुपयांचा दंड लावला. हा राग मनात धरून आमदार डॉ. मुंदडा यांच्या पुतण्यासह चौघांनी कनिष्ठ अभियंता संजय मुंढे यांना मारहाण केली. यात त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. मुंदडा यांच्या घरातील वीजमीटर त्यांच्या पत्नी रितादेवी यांच्या नावे आहे.

वसमत शहरातील अनधिकृत वीज जोडण्याची तपासणी मोहीम सुरू असताना कनिष्ठ अभियंता संजय मुंढे यांनी अहवाल दिला. मुंदडा यांचे पुतणे दीपक मुंदडा व इतर कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांना तू दंड लावतोस का असे म्हणत अभियंत्याच्या कानशिलात भडकावली. त्यात अभियंत्याच्या कानाला जबर दुखापत झाली. दीपक मुंदडा यांसह अन्य तिघांविरोधात त्गुन्हा दाखल करण्यात आला.