|| रवींद्र केसकर

जिल्ह्यत प्रमुख लोकप्रतिनिधींकडून छुप्या विरोधाची मोहीम

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांच्या नजरा
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

उस्मानाबाद : आर्थिक संपन्नतेच्या बळावर उस्मानाबाद जिल्ह्यतील नेतृत्वाची धुरा वेगाने आपल्या ताब्यात घेतलेले शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यावर शिवसनिकांच्याच रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. लक्ष्मीपुत्र सावंत यांच्या नेतृत्वालाच जिल्ह्यत खीळ बसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकेकाळी तानाजी सावंत यांच्या आíथक रसदीवर विसंबून असलेले शिवसेनेचे प्रमुख लोकप्रतिनिधीच सावंतविरोधी मोहिमेला छुपे समर्थन देत आहेत. शिवसेनेतून तानाजी सावंत यांची हकालपट्टी करा, अशी मागणी सर्वसामान्य शिवसनिक करताना दिसत असले तरी त्यामागे बोलवते धनी मात्र वेगळेच आहेत. एकंदरीत जिल्ह्यतील तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाला शह देण्याचे काम शिवसनिकांच्या मदतीने सुरू आहे. आता मातोश्री कोणाच्या बाजूने कौल देणार, यावर जिल्ह्यतील शिवसेनेची सूत्रे भविष्यात कोणाच्या हाती राहणार, याकडे शिवसनिकांचे लक्ष लागले आहे.

परंडा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांना पराभूत करून पहिल्यांदा विधानसभा सदस्य झालेले आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळ विस्तारात सामावून घेण्यात आले नाही. नाराज झालेल्या सावंत यांनी भाजपासोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीच्या सत्तासूत्रानुसार ताब्यात येणारी जिल्हा परिषद भाजपाच्या स्वाधीन केली. त्यामुळे जिल्ह्यतील शिवसनिकांमध्ये त्यांच्या भूमिकेवर रोष आहे. त्या पाश्र्वभूमीवर सोलापूरसह उस्मानाबादमधील शिवसनिकांनी बठक घेतली. या बठकीस ते अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसनिकांतून १५ दिवसांपासून लावून धरण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रित येत शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, ऐनवेळी धनंजय सावंत यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची आणि भाजपाच्या अस्मिता कांबळे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. त्यामुळे शिवसनिकांना सावंतांची भूमिका उघडपणे कळली. सावंतांची ही भूमिका पक्षाला चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून आले. प्रदेश पातळीवरही अनेक राजकीय टीकाटिप्पणी झाली. मात्र, सावंतांनी अद्यापही मौन सोडले नाही.

सावंतांचे अजूनही मौनच!

मंत्रिमंडळ विस्तारानंतरची नाराजी आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतील भूमिका याबाबत आमदार तानाजी सावंत  अद्यापही काहीही बोलले नाही. मात्र, कृतीतून त्यांनी नाराजीचे परिणाम दाखवून दिले आहेत. तानाजी सावंत यांच्या मौनामुळे शिवसनिकांमध्ये रोष आहे.