News Flash

एलबीटीविरोधातील याचिका नागपूर हायकोर्टाने फेटाळल्या

स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिका मंगळवारी फेटाळण्यात आल्या.

| April 2, 2013 05:43 am

स्थानिक संस्था कराविरोधात (एलबीटी) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिका मंगळवारी फेटाळण्यात आल्या. एलबीटीविरोधात पुणे, नागपूर, कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील व्यापाऱयांनी बंद पुकारला आहे. एक एप्रिलपासून या महापालिकांच्या क्षेत्रात एलबीटीच्या आकारणीला सुरुवात झालीये. व्यापाऱयांचा एलबीटी आकारणीला विरोध असल्यामुळे त्यांच्या विविध संघटनांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळल्या. याचिका फेटाळल्यामुळे व्यापाऱयांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2013 5:43 am

Web Title: nagpur high court dismissed petitions challenging lbt
Next Stories
1 लक्ष्मण माने यांचा जामीन अर्ज फेटाळला
2 भाजपच्या अजेंडय़ावर पुन्हा समान नागरी कायदा
3 अडचणीतील नक्षलवाद्यांचा दारूगोळ्यासाठी कंत्राटदारांवर दबाव
Just Now!
X