News Flash

‘नाशिक पेलेटॉन’ सायकल स्पर्धेदरम्यान एकाचा मृत्यू

नाशिक सायकलिस्ट संस्थेच्या वतीने रविवारी आयोजित ‘नाशिक पेलेटॉन’ स्पर्धेदरम्यान संस्थेचे सभासद दिलीप बोरावके यांचे हृदयविकाराने निधन झाले.

| February 9, 2015 01:37 am

नाशिक सायकलिस्ट संस्थेच्या वतीने रविवारी आयोजित ‘नाशिक पेलेटॉन’ स्पर्धेदरम्यान संस्थेचे सभासद दिलीप बोरावके यांचे हृदयविकाराने निधन झाले. या घटनेमुळे स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
नाशिक पेलेटॉन ही सायकल स्पर्धा रविवारी झाली. बोरावके हे घोटी ते वैतरणा या टप्प्यात सायकल चालवीत असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. त्यांना त्वरेने नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे स्पर्धेचा पारितोषिक समारंभ पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, या स्पर्धेत ५० किलोमीटर गटात सोनू गुप्ता, अनिकेत सोनवण, सर्वेश धोंडगे, देविका पाटील, प्रांजली पडोळ, डॉ. मनीषा रौंदळ, तर १५० किलोमीटर अंतराच्या १८ ते ४५ वयोगटात रवी करंडे, प्रदीप कुंडू, रमेश जोशी, के. आशीष, जितू सिंह, अमित शर्मा, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन, अरुण भोये आणि ४५ वर्षांवरील गटात मोहिंदर सिंह भारज, मरियन डिसुजा, आनंद गांगुर्डे, जयंत कंसारा, रमाकांत पाटील, दिलीप धोंडगे, दीपक भोसले, ज्ञानेश्वर गायकवाड, मुकेश चव्हाणके यांनी यश मिळविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2015 1:37 am

Web Title: nashik peloton cycling one died
टॅग : Cycling
Next Stories
1 आमदार डॉ. मुंदडांच्या निवासस्थानी ‘बायपास’ वीज जोडणी
2 राष्ट्रीय आरोग्य अभियानातून अडीच हजार पदे रद्द?
3 मल्लिनाथ महाराजांविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा
Just Now!
X