News Flash

विदर्भ व खानदेशातील १४ जिल्ह्यांमध्ये निघणार “राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा”

'संवाद कार्यकर्त्यांशी,पक्षाच्या केंद्रबिंदूशी' या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची घोषणा

संग्रहीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी “राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे” चे आयोजन करण्यात आले आहे. ‘संवाद कार्यकर्त्यांशी,पक्षाच्या केंद्रबिंदूशी’ या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

“गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून २८ जानेवारी रोजी या दौर्‍याची सुरुवात होणार आहे. सलग १७ दिवस विदर्भ, खानदेशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा संवाद यात्रेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. या दौऱ्यात पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार या १४ जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या जातील व पक्ष वाढवण्यासाठी रणनिती आखली जाईल.” असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

या यात्रेत जयंत पाटील यांच्यासोबत प्रफुल पटेल, अनिल देशमुख, महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह युवक – युवती, विद्यार्थी व पक्षाच्या विविध सेलचे प्रदेश अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 4:33 pm

Web Title: nationalist family dialogue yatra to be held in 14 districts of vidarbha and khandesh msr 87
Next Stories
1 “साताऱ्यात साकारणार जैवविविधता उद्यान, पोलीस दलाचे ३० एकर क्षेत्र आरक्षित”
2 “प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चालली असून गणतंत्र हे संघतंत्र होऊ नये, म्हणून…”
3 “कोविडचे नियम पाळून यावर्षीचा कृष्णाबाई उत्सव साजरा करावा”
Just Now!
X