हवेत असलेल्या या सरकारला जमिनीवर आणण्याचे काम तुम्हा-आम्हाला करायचे आहे त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी भिवंडी येथील जाहीर सभेत केले.

विकासाचा मुद्दा बाजुला ठेवून भाजपा सरकार मंदिर-मशिदीचा मुद्दा घेवून धंदा करत आहे. राम-रहीम हे एक होते. परंतु, या लोकांनी त्यांना बाजूला केले असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. ज्याने कधी खेळण्यातली विमानं कधी बनवली नाहीत. त्या अंबानीला राफेलची विमानं बनवण्याचा ठेका देण्यात आला, असा आरोपही त्यांनी यांनी केला.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मालमत्ता कर एक ते दीड लाखांवर गेला आहे. मग उद्योगधंदे कसे राहणार. आज आरोग्य धोक्यात आले आहे. १९९६ मध्ये २ लाख लोकसंख्या होती. त्यावेळी ११५ डॉक्टर होते. परंतु आज १८ लाखांच्यावर लोकसंख्या गेली आणि डॉक्टर फक्त ३६ आहेत. लोकांनी जगायचे कसे असा सवालही भुजबळ यांनी केला.