राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गोिवदराव वामनराव आदिक (वय ७६) यांचे शनिवारी मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील पब्लिक स्कूलच्या आवारात रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आदिक हे फुफ्फुसाच्या जंतू संसर्गाने आजारी होते. त्यांना आठ दिवसापूर्वी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी ११.३० वाजता त्यांची प्रकृती खालावली. ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. त्यांचे रात्री निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी पुष्पलता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाचे उपाध्यक्ष असलेले चिरंजीव अविनाश व सुजाता, अनुराधा, अंजली या मुली तसेच केशवराव हे ज्येष्ठ बंधू आहेत. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक यांचे ते धाकटे बंधू होत.  mh05राज्याच्या राजकारणात स्वत:च्या कर्तृत्वाने ठसा उमटवलेले आदिक हे ४५ वर्षे सक्रिय होते. एक वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. विधि शाखेचे पदवीधर असलेले आदिक यांनी १९६६ ते १९७० च्या दरम्यान येथील न्यायालयात वकिली सुरू केली. काही काळ महाविद्यालयात कायद्याचे प्राध्यापकही होते. वकिली सुरु असताना ते राजकारणात पडले. काँग्रेसचे सरचिटणीस झाले. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेत तयार झालेले ते नेते होते. पुलोदच्या निर्मितीत माजी मुख्यमंत्री शरद पवारांचे ते भरभक्कम साथीदार होते. आयुष्यभर पक्षसंघटनेत विविध पदे त्यांनी भूषविली.

Ranajagjitsinha Patil ajit pawar malhar patil
“२०१९ मध्ये अजित पवारांनीच आम्हाला भाजपात पाठवलं अन्…”, राणाजगजीतसिंह पाटलांच्या मुलाचा मोठा गौप्यस्फोट
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
narayan rane
शिंदेंची रत्नागिरीत ताकद नाही; राणेंचा दावा