संबधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांची कर्मचाऱ्यांकडून हेळसांड होत असल्याची चित्रफीत सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. अतिदक्षता विभागातील नवजात बालकाची अवहेलना करून परिचारिका मोबाईलवर चॅटिंग करण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे वागणाऱ्या या विभागातील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

अलिबागचे जिल्हा रूग्णालय हे गोरगरीब रूग्णांसाठी मोठा आधार आहे. याच रूग्णालयात दिपाली दांडेकर ही गरोदर महिला १ जून रोजी बाळंतपणासाठी दाखल झाली. तिला जुळे झाले मात्र बालकांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना बालकांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्याात आले होते. १२ तारखेला रात्री कर्तव्यात असलेल्या परिचारिकेला बाळाच्याा नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांनी बाळाच्या प्रकृतीची माहिती देण्याऐवजी दुरूत्तरे केली आणि एका नवजात शिशुच्या बकोटीला धरून मोबाईल चॅटींगमध्ये  व्यस्त राहिली. हा सर्व प्रकार नातेवाईकांनी आपल्या  मोबाईलमध्ये चित्रित केला.  तिच्या या कृत्याबाबत  चीड व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून बाळाच्या नातेवाईकांनी परिचारिकेच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.  रुग्णालयात नवजात बालकांची होणारी हेळसांड हा चच्रेचा विषय बनला आहे.

दरम्यान जन्मलेल्या दोन जुळ्या बालकांपकी एकाचा मृत्यू झाला असला तरी त्याबद्दल नातेवाईकांची कोणतीही तक्रार नाही. मात्र परिचारिकेने दाखवलेल्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी रात्री त्या बालकाच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात येऊन अतिरिक्त जिल्हा शल्याचिकि त्सक डॉ. ए. एस. फुटाणे यांची भेट घेवून संबंधित परिचारिका व त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर्सवर कारवाई करण्याची मागणी केली.

परिचारिकेने दाखवलेला बेजबाबदारपणा हा निषेधार्ह आहे. यासंदर्भात आम्ही रूग्णालय प्रशासनाची भेट घेवून तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे. इतर रूग्णांना असा अनुभव यापुढे येवू नये. यासाठी आमचा हा लढा आहे. त्या परिचारिकेवर कारवाई होईपर्यंत आमची लढाई सुरूच राहणार आहे.’  रमेश मोरे , रूग्णाचे नातेवाईक

‘परिचारिकेच्या वर्तणुकीबाबत नातेवाईकांची तक्रार आहे. या सदंर्भात परिचारिका वाघमारे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात येणार आहे. त्यानंतर त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल.’  डॉ. ए. एस. फुटाणे,अतिरिक्त. जिल्हा शल्य चिकित्सक