17 January 2021

News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना नितीन गडकरी म्हणाले…

'देशाच्या भविष्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे व्हिजन आहे, चांगल्या कल्पना आहेत'

“नरेंद्र मोदींनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलं आहे. प्रत्येक मिनिटाला देशासाठी आपण काय चांगलं करु शकतो हा विचार ते करत असतात” अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. लोकसत्ताच्या सहज बोलता, बोलता वेब संवादामध्ये ते बोलत होते.

“देशाच्या भविष्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे व्हिजन आहे, चांगल्या कल्पना आहेत. महत्वाचं म्हणजे जिद्दीने काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. देशाला पुढे नेण्याचं कॅलिबर त्यांच्यामध्ये आहे” असे गडकरी म्हणाले.

“करोना व्हायरसमुळे सध्या निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे एक परीक्षा आहे. हे सगळं सोप नाहीय. मोदींनी २० लाख कोटींच पॅकेज जाहीर केलं आहे. बोलायला सोपं आहे पण करायला कठिण आहे याची जाणीव आम्हाला आहे. पण सर्वांच्या आशिर्वादाने पुढे जाऊ. गाडीला धक्कामारुन बाहेर काढू” असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

जगातले सगळे देश सध्या चीनवर खवळले आहेत. चीनमधून बाहेर निघणाऱ्या कारखान्यांसाठी जपान सरकारने योजना आणली आहे. या सगळया परिस्थिती आपण आपला जास्तीत जास्त फायदा करुन घेतला पाहिजे असे गडकरी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2020 9:07 pm

Web Title: nitin gadkari praise pm narendra modi leadership dmp 82
Next Stories
1 Coronavirus : चंद्रपूर जिल्ह्यातील 317 नमुन्यांपैकी 280 नमुने निगेटिव्ह
2 दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी अखेर परतणार
3 आईने केलेले संस्कार हीच माझी पुंजी- नितीन गडकरी
Just Now!
X