News Flash

मतदानाच्या आदल्या दिवशीच्या ‘निरोपा’ चा आता परिणाम नाही!

संपर्काच्या वेगवान साधनांमुळे आता नेत्यांचा कल कार्यकर्त्यांना तत्काळ कळू लागला आहे. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशीच्या ‘निरोपा’ वर मतदान बदलणार नाही, अशी मानसिकता मतदारांमध्ये तयार

| April 2, 2014 01:49 am

निवडणुकीत प्रचार कोणाचाही करो, पण मतदानाच्या पूर्वसंध्येला नेत्याच्या ‘निरोपा’वरच मतदानाची दिशा ठरत असे. त्यातून पक्षांतर्गत नाराज आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला िखडीत गाठण्याची संधी साधत. त्यामुळे ‘निरोपा’ ला विशेष महत्त्व होते. पण संपर्काच्या वेगवान साधनांमुळे आता नेत्यांचा कल कार्यकर्त्यांना तत्काळ कळू लागला आहे. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशीच्या ‘निरोपा’ वर मतदान बदलणार नाही, अशी मानसिकता मतदारांमध्ये तयार झाल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. नेत्यांना उघड व गुपीत अशा दुहेरी भूमिका घेणे शक्य होणार नाही, असे या पाहणीतील निष्कर्ष आहेत.
बीड जिल्हय़ातील राजकारणाचा तळ अजून तरी कोणाला सापडला नाही. कोण कोणत्या पक्षात व कोण कोणाबरोबर आहे याचा थांगही भल्याभल्यांना लागत नाही. त्यामुळे बहुमत नसतानाही स्थानिक संस्थेत कोणाचीही सत्ता येऊ शकते, तर विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही कोण कोणाला हात दाखवेल, याचा नेम नाही. पूर्वी संपर्काची साधने फारशी नव्हती. राजकीय नेते पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ फिरत असले, तरी मतदानाच्या पूर्वसंध्येला आपल्या खास दूतामार्फत गावागावात कोणाला मतदान करायचे, याचा ‘निरोप’ पाठवत. नेत्याचा निरोप आला की गावातील कार्यकत्रेही आदेश समजून मतदान करून घेत. यात बहुतांशी वेळा स्वतच्या पक्षाच्या उमेदवारालाच िखडीत गाठण्याची संधी साधली जाई. त्यामुळे आतापर्यंत मतदानाच्या आदल्या दिवशी येणाऱ्या निरोपांना विशेष महत्त्व होते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून संपर्काची साधने वाढल्याने काही वेळातच नेत्यांच्या भूमिका गावपातळीवरील मतदारापर्यंत पोहोचतात. त्यामुळे आदल्या दिवशी येणाऱ्या निरोपाला फारसे महत्त्व राहिले नसल्याचे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. भूल दिल्याशिवाय शस्त्रक्रिया करता येत नाही. तसे दिशाभूल केल्याशिवाय राजकारण शक्य नाही, असे मानले जाते. या पाश्र्वभूमीवर शास्त्रीय पद्धतीचा वापर करीत नतिकता व तटस्थता बाळगून समस्या सूत्र, निरीक्षण, वर्गीकरण, गृहितकृत्य, पडताळणी, तथ्य संकलन या माध्यमातून २०० मतदारांची मते जाणून घेण्यात आली. दहा प्रश्न विचारल्यानंतर ५५ टक्के मतदारांनी आपले प्रचाराकडे लक्ष असल्याचे, तर ४५ टक्के मतदारांचे लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले.
निवडणुकीच्या तोंडावर दलबदलू नेत्यांचा मतदारांवर काय परिणाम होईल, या बाबत केवळ ३० टक्के लोकच परिणाम होईल, असे म्हणतात. ७० टक्के लोकांना परिणाम होणार नसल्याचे वाटते. विकासाच्या मुद्यावर राजकारणी बोलतच नसल्याने ६० टक्के मतदार नाराज, तर ४० टक्के मतदारांना राजकारणी विकासाच्या मुद्यावर बोलतात, असे वाटते. एकमेकांचा आदर करत राजकारण होते, असे म्हणणारे ७० टक्के मतदार आहेत. ३० टक्के मतदारांनी राजकारणी एकमेकांचा आदर करीत नसल्याचे मत नोंदवले आहे. पक्षांतर व बंडखोरी ही वैयक्तिक स्वार्थापोटी, तसेच उचापतखोरच करतात. असे लोक पक्षाशी प्रामाणिक नसल्याचे ६५ टक्के लोकांचे मत आहे, तर आणखी ३५ टक्के लोक स्वतच्या पक्षाशी प्रामाणिक नसतात. त्यामुळे बदलत्या स्थितीत मतदानाच्या आदल्या दिवशी येणाऱ्या निरोपावर मतदान बदलणे आता शक्य नसल्याचे यावरून स्पष्ट झाल्याचे अॅड. अजित देशमुख यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2014 1:49 am

Web Title: now previous day voting message no effect
Next Stories
1 मोदी यांच्या सभेत शर्विलकांची चांदी!
2 ‘निवडणूक मात्र लढविणारच’
3 घनकचरा, स्वच्छता करापोटी लातूरकरांकडून अडीच कोटी
Just Now!
X