पालघर तालुक्यातील बोईसर येथील एका कुटुंबातील ११ सदस्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्याने, बोईसरमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

बोईसर-शिगाव मार्गावर रेल्वे फाटकाजवळ एका व्यक्तीला ताप व श्वसनाचे विकार असल्याने, त्यांना प्रथम दोन खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. मात्र  त्यानंतरही प्रकृती खालावल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रुग्णालयातच त्यांचे निधन झाले. यानंतर त्यांची मनोत्तर करोना चाचणी करण्यात आली. चाचणीमध्ये त्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले होते, त्यानंतर त्यांच्या  संपर्कात आलेल्यांची तपासणी केली करण्यात आली. यामध्ये  कुटुंबातील ११ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा- चिंता वाढली! करोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र चीनलाही मागे टाकण्याच्या मार्गावर

याखेरीज बोईसर पूर्वेकडील टाटा हाऊसिंग कॉलनीमधील एकास तसेच पालघर शहरातील विष्णुनगर परिसरात प्रत्येकी एकाला करोना झाल्याचे उघडकीस आले आहे. आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालात पालघर तालुक्यात १४ नवीन रुग्ण आढळले असून तालुक्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.