News Flash

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाल्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवत पक्षाने माझ्यावर जो

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवत पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी आभारी आहे. मला राष्ट्रीय कार्यकारिणीत जे स्थान देण्यात आलं आणि मला जे पद देण्यात आलं तो मी माझा सन्मान समजते असंही त्यांनी म्हटलं आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि माजी मंत्री विनोद तावडे या दोघांनाही भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आलं आहे. भाजपाने आज राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव ही जबाबदारी देण्यात आली आहे. हा निर्णय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 6:22 pm

Web Title: pankaja mundes first reaction after being elected to the bjps national executive
Next Stories
1 “सतत पवारांसोबत राहून राऊतांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली”
2 …पण सरकार बुडणाऱ्या जहाजाची छिद्रं बुजवतंय; रोहित पवार यांची मोदी सरकार टीका
3 “ये अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं,” भाजपा नेत्याचा मोठा दावा
Just Now!
X