परभणी जिल्हा बँकेचे विभाजन करून िहगोलीला स्वतंत्र जिल्हा बँक देता येणार नाही. आर्थिकदृष्टय़ा ते शक्य नाही, असे सांगून कयाधू नदीवरील बंधाऱ्याचे कामही राज्यपाल कार्यालयाकडून काही बंधने घातली गेल्यामुळे सध्या तरी करता येणार नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. दरम्यान, राज्यात आघाडीच्या जागावाटपावर सन्मानपूर्वक तोडगा न निघाल्यास आमची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे. परंतु जागावाटपाचा अंतिम निर्णय पक्षाचे नेते शरद पवार व सोनिया गांधीच घेतील, असेही ते म्हणाले.
वसमत उपविभागीय कार्यालयात जिल्ह्य़ातील टंचाईसदृश आढावा बैठक व राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा पवार यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर पूर्णा साखर कारखान्याच्या सभागृहात आयोजित बठकीत पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यमंत्री फौजिया खान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयप्रकाश दांडेगावकर उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या विभाजनासंदर्भात विचारणा केली असता पवार म्हणाले की, िहगोली जिल्हा अत्यंत लहान आहे. जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने विभाजनाला नाबार्डकडून परवानगी मिळत नसल्याने परभणी जिल्हा बँकेचे विभाजन तूर्त होणार नाही. कयाधू नदीवरील बंधाऱ्याबाबत ते म्हणाले की, सिंचनाच्या मुद्यावर राज्यपालांच्या कार्यालयाकडून काही बंधने घालण्यात आली आहेत. ही बंधने कयाधू नदीवरील बंधाऱ्याच्या कामाआड येत आहेत. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, त्यांना आर्थिक मदत मिळाली नसल्याच्या तक्रारींत वाढ होत आहे. ही मदत मिळणार काय, या प्रश्नावर या बाबत तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. िहगोली व वसमत शहरातील पाणीपुरवठय़ाची कामे पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे ६ व ५ कोटींचा निधी मंजूर केला असून, टंचाईकाळात निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.