22 October 2019

News Flash

पाच हजारांची लाच घेताना पोलीस नाईक अटकेत

न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वारंट तामील करून आरोपीस अटक न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिसास सोमवारी अटक करण्यात आली.

| December 2, 2014 01:30 am

न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वारंट तामील करून आरोपीस अटक न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिसास सोमवारी अटक करण्यात आली. मानवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दत्तराव जनार्दन जायभाये, असे आरोपीचे नाव आहे.  परभणी येथील एका हॉटेलात लाच घेताना त्याला पकडण्यात आले.
 मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका आरोपीस न्यायालयाने अजामीनपात्र वारंट बजावले होते. ते न बजावता अटक टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी आरोपी जायभाये याने केली. यासंबंधीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करण्यात आली. त्यानुसार सोमवारी सकाळी जिंतूर रोडवरील हॉटेल जगदंबा येथे सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात पोलीस नाईक जायभाये याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. हा सापळा पोलीस उपअधीक्षक अनिल गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडला.

First Published on December 2, 2014 1:30 am

Web Title: police arrest in corruption