कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला महागडय़ा चारचाकी गाडीमधून येणारे माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या मालकीची केवळ ७० हजार रुपयांची गाडी त्यांच्याकडे आहे! पत्नी, दोन मुले व त्यांची स्वत:ची मिळून स्थावर, जंगम आणि रोख मालमत्ता ३० कोटींहून अधिक आहे, तर शिवसेनेचे आमदार ओम राजेिनबाळकर सव्वाचार कोटींचे धनी आहेत. निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या शपथपत्रात ही माहिती नमूद केली आहे.
राणाजगजितसिंह यांच्याकडे साडेबारा लाख, पत्नीकडे सव्वाचार लाख, मुलगा मल्हार याच्याकडे १ लाख ३२ हजार, तर दुसरा मुलगा मेघ याच्याकडे ६२ हजार रुपयांची रोकड असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. राणा पाटील यांच्या नावे साडेबारा लाख रुपयांचे, तर अर्चना पाटील यांच्या नावे ३० लाख रुपये ठेव आहे. राणा पाटील यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात ३ कोटी १७ लाख ५४ हजारांची गुंतवणूक केली, तर अर्चना यांच्या नावावरची गुंतवणूक ११ लाख ३१ हजार आहे. पती-पत्नीची विमा पॉलिसीमध्ये ३ कोटी ३० लाख रुपयांची गुंतवणूक आहे.
राणा पाटील यांच्याकडे १२ लाख, अर्चना पाटील ८४ लाख, मल्हार पाटील पावणेसात लाख व मेघ पाटील यांच्याकडे ४ लाख रुपयांचे दागिने आहेत. राणा पाटील यांच्या नावे वेगवेगळ्या ठिकाणी २१ कोटी ४४ लाख रुपयांची, तर अर्चना यांच्या नावे ५७ लाख ७७ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. दोघांवरही १ कोटी ३५ लाख रुपयांचे कर्ज, तर ७३ लाख ३५ हजार रुपयांची देणी आहेत.
राजेिनबाळकर व त्यांची पत्नी संयोजिनी या दोघांच्या नावे रोकड, जंगम व स्थावर अशी एकूण सव्वाचार कोटींची मालमत्ता आहे. राजेिनबाळकर यांच्याकडे साडेतीन लाख, त्यांच्या पत्नींकडे केवळ १० हजार रुपयांची रोकड आहे. दोघांकडे मिळून ३५ तोळे सोने आहे. राजेिनबाळकर यांच्या नावे ४५ लाख, तर पत्नीच्या नावे ३० लाख रुपयांची वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक आहे. आमदारांच्या नावे १ कोटी ७८ लाख, तर त्यांच्या पत्नीकडे १ कोटी १५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. राजेिनबाळकर यांच्यावर ५ लाख ५४ हजार, तर त्यांच्या पत्नीकडे ९ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज आहे. राजेिनबाळकर यांच्याकडे २६ हजार रुपयांचे रिव्हॉल्वर असल्याचेही शपथपत्रात म्हटले आहे.
अमित देशमुख १० कोटी ३५ लाख संपत्तीचे मालक
वार्ताहर, लातूर
लातूर शहर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अमित देशमुख यांच्याकडे १० कोटी ३५ लाखांची संपत्ती आहे. २००९ च्या तुलनेत त्यांच्याकडील संपत्तीत १ कोटी १९ लाखांची भर पडली आहे.
मागील निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या संपत्तीच्या विवरणात त्यांच्याकडे रोख रक्कम ७ लाख ५५ हजार होते. या निवडणुकीच्या शपथपत्रात दाखवलेली रोख रक्कम ७ लाख २५ हजार आहे. पत्नीच्या नावे १ लाख ५० हजार, तर मुले अवीर व अवन या दोघांकडे प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपये आहेत. २००९ मध्ये बँकेतील खात्यांमध्ये २ कोटी ५५ लाखांच्या ठेवी व ३ कोटी २८ लाख विविध कंपन्यांतील भागभांडवल म्हणून गुंतविले होते. सोने, हिरे व इतर मालमत्ता ४८ लाख ४८ हजारांची होती. एकही चारचाकी वाहन त्यांच्या नावावर नव्हते, अशी २००९ मधील नोंद या निवडणुकीत बदलली. त्यांच्या पत्नीकडे ६ लाख ५ हजारांची चारचाकी गाडी (फोर्ड) आहे. या निवडणुकीत १० कोटी ३५ लाख ७९ हजार २५८ रुपये संपत्ती त्यांच्या नावावर आहे. त्यांची पत्नी आदिती यांच्याकडील २८ लाख ३७ हजार २६७ रुपयांच्या मालमत्तेचाही समावेश आहे. अचल संपत्तीत ३ कोटी ९४ लाख ४९ हजार ३४९ रुपयांची संपत्ती स्वत:कडे, तर पत्नीच्या नावे १६ लाख २८ हजार रुपयांची अचल संपत्ती असल्याचे शपथपत्रात नमूद आहे. बाभळगाव येथे वाडा, तसेच औरंगाबाद येथे मुकुंदवाडीतील कनॉट प्लेस भागात सदनिकाही असल्याचे नमूद केले आहे. गेल्या ५ वर्षांत देशमुख यांच्या मालमत्तेत केवळ १ कोटी १९ लाखांचीच भर पडली आहे.

Sambhaji Bhide Meets Devendra Fadnavis in Sangli
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानात संभाजी भिडेंनी नेमकं काय सांगितलं? चर्चांना उधाण
Kolhapur Congress candidate Chhatrapati Shahu Maharaj is the most rich candidate
शाहू महाराज सर्वाधिक ‘श्रीमंत’ उमेदवार; स्थावर, जंगम अशी २९७ कोटींची संपत्ती
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप