व्हिडिओ गेम्सची तरुणाईला पडलेली भुरळ काही नवीन नाही, पण PlayerUnknown’s Battleground म्हणजेच PUBG या गेमने सध्या तरुणाईच्या विश्वात अक्षरशः धुमाकुळ घातलाय. या अॅक्शनपॅक्ड गेमचे अनेक दुष्परिणाम रोजच्या रोज समोर येत असतानाही हा गेम खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच भर म्हणून की काय दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या युवासेनेने चक्क पबजी गेमच्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

रायगडमधल्या रोहा तालुक्यात युवासेनेतर्फे पबजी टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. याचं डिजीटल पोस्टर बनवण्यात आलं असून त्याच्यावर बाळासाहेबांच्या फोटोसह ‘बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन’ आणि यानिमित्त ‘रोहा शहरात प्रथमच रोहा तालुका स्तरीय पबजी टुर्नामेंटचे आयोजन’ असा मजकूर लिहीण्यात आला आहे. आजपासून रोह्यातील सार्वजनिक भाटे वाचनालय या ठिकाणी या टुर्नामेंटला सुरूवात देखील झाली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिस आणि चषक दिलं जात आहे.

Ajit Pawar On Navneet Rana
“नवनीत राणा यांच्या विजयासाठी…”; उपमुख्यमंत्री अजित पवार चुकून काय म्हणाले?
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?

23 जानेवारी रोजी बाळासाहेबांची जयंती आहे, आणि त्यांच्या जयंतीनिमित्त ते सदैव आपल्यात रहावे यासाठी शिवसेनेतर्फे दरवर्षी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण, एकीकडे पबजीवर बंदी घातली नाही तर अनेक मुले नापास होतील, अशी भीती व्यक्त करीत जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे पबजीवर बंदी घालण्याची मागणी केली असताना तरुणांसाठी घातक ठरत असलेल्या ‘पबजी’ गेमच्या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आल्याने विविध क्षेत्रांतून नाराजीचा सूर उमटत आहे.