News Flash

पुणे : उकळतं दूध अंगावर पडल्याने एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू

भार्गवीच्या मृत्यूमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

पुणे : उकळतं दूध अंगावर पडल्याने एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू
(सांकेतिक छायाचित्र)

उकळते दूध अंगावर पडल्याने एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील धायरी परिसरात ही घटना घडली. भार्गवी अक्षय कुलकर्णी (वय – 1 वर्ष,रायकर मळा, धायरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी भार्गवी घरामध्ये खेळत असताना तिच्या अंगावर उकळतं दूध पडलं. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण तिच्यावर उपचार सुरू असतानाच आज सकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भार्गवीच्या मृत्यूमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2018 12:38 pm

Web Title: pune boiling milk causes one year old baby girl dies
Next Stories
1 मराठा आंदोलनात घुसलेल्या परप्रांतीयांचा चाकण हिंसाचारात सहभाग : पोलीस
2 मराठा आंदोलन : चाकणमधील हिंसाचारप्रकरणी ५ हजार जणांवर सामूहिक गुन्हा दाखल
3 सायकल चोरीला गेल्याने चिडलेल्या अल्पवयीन मुलाने पेटवल्या दुचाकी
Just Now!
X