माळीण गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सहाव्या दिवशीही मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू असून, सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे १३० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. अद्याप २० ते ३० मृतदेह ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत सर्व उत्खनन पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ३ ते ४ दिवस या गावावर माती लोटण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे माळीण गावाची ओळखच पुसली जाणार आहे. दरम्यान, भूशास्त्रज्ञ, एनडीआरएफच्या निष्कर्षांनुसार गावातील धोकादायक असलेली घरे रिकामी करण्याच्या नोटिसा जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्या आहेत.
माळीण येथील ४५ घरे रिकामी करण्याची नोटीस जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. सोमवारी दिवसभरात २३ मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. या सर्वाचे जागेवरच शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात येत होते, मातीच्या ढिगाऱ्यातून जनावरेही मोठय़ा प्रमाणात निघत असल्याने त्यांचीही विल्हेवाट लावण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
माळीणकडे येणाऱ्या लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. िडभे येथून माळीणकडे जाणाऱ्या लोकांना सोडत नसल्यामुळे मृताच्या नातेवाइकांनी आरडाओरडा केला होता. त्यामुळे प्रशासनाने िडभे येथून माळीणकडे जाण्यासाठी दोन मिनीबसची व्यवस्था केली आहे. माळीण येथे जाणाऱ्यांना आता यापुढे पास दिले जाणार आहेत. मदत देण्यासाठी अथवा मदत कार्यासाठी जाणाऱ्यांना मागणी केल्यास पास दिले जातील. ज्यांना मदत द्यायची आहे त्यांची मदत केंद्रावर स्वीकारली जाईल अशी माहिती मंचर येथील मदत केंद्रातील अधिकारी प्रांत हिंमतराव खराडे यांनी दिली. माळीण येथे अत्यावश्यक काम असेल  तरच लोकांनी जावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, रविवारी माळीणला आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत, राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी भेट दिली.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच