17 December 2017

News Flash

रायगड जिल्ह्य़ात मुद्रा योजनेंतर्गत १६९ कोटींची कर्ज वितरीत

या योजने अंतर्गत शिशू गट, किशोर गट आणि तरुण गट या तीन गटात मुद्रा

हर्षद कशाळकर, अलिबाग | Updated: March 10, 2017 6:50 PM

रायगड जिल्ह्य़ात प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत २०१६-१७ या आíथक वर्षांत १६९ कोटींची कर्ज वितरीत करण्यात आली. युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.

या योजने अंतर्गत शिशू गट, किशोर गट आणि तरुण गट या तीन गटात मुद्रा कर्ज वितरण करण्यात आले. या शिशू गटातील १२ हजार ३१५ उद्योजकांना प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे ३६ कोटी ७ लाख रुपयांची कर्ज वितरीत करण्यात आली. किशोर गटात ३ हजार ३८२ उद्योजकांना प्रत्येकी ५ लाखपर्यंत एकूण ७५ कोटी २८ लाख रुपयांची मुद्रा कर्ज वितरीत करण्यात आली. तरुण गटात ७८७ उद्योजकांना प्रत्येकी १० लाखांपर्यंत ५७ कोटी ५२ लाख रुपयांची कर्ज वितरीत करण्यात आली आहेत.

म्हणजेचे गेल्या आíथक वर्षांत जिल्ह्य़ातील १६ हजार ४८४ नवउद्योजकांनी मुद्रा योजनेचा लाभ घेतला असून १६९ कोटी रुपयांची कर्ज वितरीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शितल उगले यांनी दिली. या योजने अंतर्गत राज्यात २०१६-१७ या आíथक वर्षांत तब्बल १२ हजार ३८६ कोटींची मुद्रा कर्ज वितरीत करण्यात आली असून २५ लाख ४३ हजार ९०७ नवउद्योजकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच २०१५-१६ या आíथक वर्षांत तब्बल १३ हजार ३७२ कोटींची मुद्रा कर्ज वितरीत करण्यात आली होती. यात ३५ लाख ३५ हजार ६५ नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला. रायगड जिल्ह्य़ात गेल्या वर्षी २०१५-१६ मध्ये या योजने

अंतर्गत १०६ कोटींची कर्ज वितरीत करण्यात आली होती. यावर्षी डिसेंबर अखेपर्यंत तब्बल १६९ कोटींची मुद्रा कर्ज वितरीत झाली आहेत. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल ६३ कोटींची अधिक मुद्रा कर्ज वितरीत करण्यात आली आहेत.

जिल्ह्य़ात मुद्रा कर्ज वितरणाबाबत काही तक्रारी असतील तर जिल्हा अग्रणी बँक अथवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तर त्याचे निवारण करण्यात येईल. अशी ग्वाही जिल्हाधिकारी उगले यांनी दिली.

First Published on March 8, 2017 1:24 am

Web Title: raigad mudra yojana