देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्लय़ावरील तिहेरी तटबंदी पैकी दुसरी चिलखती तटबंदी साधारणपणे ३० ते ४० फूट कोसळली आहे.

समुद्राकडील पूर्वेच्या बाजूने असलेली दुसरी चिलखती तटबंदी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जमीन ओली होऊन मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली.  किल्लय़ामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास हा प्रकार बुधवारी सकाळी आल्यानंतर त्यांनी तातडीने पुरातत्व विभागास सदर गोष्टीची कल्पना दिली. पुरातत्व विभागाकडून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

दरम्यान, पुरातत्व विभागाने या घटनेचे गांभीर्य ओळखून वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर या ऐतिहासिक किल्लय़ाचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी चिंता इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.