News Flash

मराठवाडय़ात सर्वत्र ईद उत्साहात साजरी

रमजान ईदचा सण मुस्लिम बांधवांनी मोठय़ा उत्साहात साजरा केला. शहरातील ईदगाह मदानावर सकाळी १० वाजता ईदनिमित्त सामूहिक नमाज अदा केली.

| July 19, 2015 01:56 am

रमजान ईदचा सण मुस्लिम बांधवांनी मोठय़ा उत्साहात साजरा केला. शहरातील ईदगाह मदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी सकाळी १० वाजता ईदनिमित्त सामूहिक नमाज अदा केली. त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीचे माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, माजी आमदार ओमप्रकाश राजेिनबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, नगराध्यक्ष मकरंद राजेिनबाळकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास िशदे, बालाजी साळुंके, मुख्याधिकारी शशिमोहन नंदा, तहसीलदार सुभाष काकडे, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह विविध पक्ष, संस्था व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध मशिदींमधून सकाळी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदमुळे बहुतांश बाजारपेठ दिवसभर बंद होती. ईदनिमित्त प्रमुख बाजारपेठेसह राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अनेक दुकाने, मोटार गॅरेज बंद राहिल्याने रहदारी तुरळक प्रमाणात जाणवत होती.
बीडमध्ये उत्साहात
शुक्रवारी चंद्रदर्शनानंतर बीड जिल्ह्यात शनिवारी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील नाळवंडीरस्ता व बालेपीर परिसरातील ईदगाह मदानावर मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली. राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, रिपाइंचे पप्पू कागदे, माजी आमदार राजेंद्र जगताप, राजेंद्र मस्के, डॉ. योगेश क्षीरसागर, तसेच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. बालेपीर भागातील ईदगाह मदानावर ईदची नमाज अदा करण्यात आली. अंबाजोगाई, केज, आष्टी, पाटोदा, शिरुर, परळी, माजलगाव, गेवराई, वडवणी, धारुर तालुक्यांतही ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदच्या नमाजानंतर ठिकठिकाणी पावसासाठी प्रार्थना करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 1:56 am

Web Title: ramzan eid celebrate
Next Stories
1 दांगट अभ्यास गटाकडून दुसऱ्या मुदतवाढीस विनंती?
2 आयुक्तांपुढेच जैववैद्यकीय कचरा टाकला जातो तेव्हा..!
3 मुलाच्या अपहरणप्रकरणी लातुरात तीनजणांना अटक
Just Now!
X