रायगड जिल्हा प्रशासनाला जाग
मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडे माध्यमांनी लक्ष्य वेधल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती, डागडुजी तातडीने करावी; अन्यथा संबंधितांना कारवाईस सामोरे जावे लागले, असा इशारा जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी दिला आहे. गणेशोत्सवला आता १५ दिवस उरले असल्याने महामार्ग दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण होणे कठीण आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने २ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महामार्ग दुरुस्ती व त्यासंबंधीच्या इतर प्रश्नांबाबत गुरुवारी तातडीने आढावा बठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बठकीला विविध विभागांचे अधिकारी
उपस्थित होते.
बठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेने कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश दिले. या कामाची पाहणी करण्याकरिता पेण, रोहा, महाड प्रांत त्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक यांनी संबंधित कंत्राटदारांसह संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करावा असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, अशी समज त्यांनी दिली. भोगावती नदीवरील पूल, वडखळ येथील खड्डय़ांची दुरुस्ती आदीही कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सांगण्यात आले.
पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या पाहणीनुसार राष्ट्रीय महामार्ग १७ वर रायगड जिल्ह्य़ाच्या हद्दीत असलेल्या पोलिसांनी अधोरेखित केलेल्या ४२ अपघातप्रणव ठिकाणांवर साइन बोर्ड, िब्लकर, बॅरिकेट्स लावण्याबाबतचीही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या काळात रुग्णवाहिका सुसज्ज ठेवून डॉक्टरांचे पथकही तयार ठेवण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना सूचना करण्यात आल्या. याखेरीज एस.टी. महामंडळाच्या बसेस, इतर वाहतूक, परिवहन विभागाचे कामकाज या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रश्न मात्र कायम
दर वर्षी गणेशोत्सव आणि त्या अनुषंगाने करावयाचे नियोजन दीड ते दोन महिने आधी सुरू केले जाते. यात महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग, पोलीस, परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असतो. गणेशोत्सव काळात वाढणाऱ्या वाहनसंख्येला लक्षात घेऊन महामार्गाच्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नंतर पालकमंत्री या महामार्ग दुरुस्ती आणि वाहतूक नियोजनाचा आढावा घेतात. पण या वर्षी या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता १५ दिवसांत चाळण झालेल्या महामार्गाची दुरुस्ती कशी होणार, हा प्रश्न मात्र कायम आहे.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…