22 September 2020

News Flash

कसारा घाटातील रस्ता खचला, मुंबई-नाशिक वाहतुकीवर परिणाम

मुसळधार पावसामुळे नाशिक-मुंबई मार्गावरील कसारा घाटातील रस्ता खचला

मुसळधार पावसामुळे नाशिक-मुंबई मार्गावरील जुन्या कसारा घाटातील रस्ता खचल्याची माहिती आहे. रस्ता खचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

जुन्या कसारा घाटातील आंबा पॉईंटच्याजवळ 500 मीटरचा रस्ता खचला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे गेल्याचे दिसून आले. परिणामी सुरक्षेची खबरदारी म्हणून पोलिस खचलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून पोलीस वाहनधारकांना मार्गदर्शन करत आहे. घाटातील वाहतूक एकेरी मार्गे सुरू आहे. याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून घाटातील रेल्वे व रस्ता मार्गावरील दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत.

दरम्यान, ही घटना समजल्यानंतर कसारा महामार्ग पोलीस आणि शहापुरचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. पोलीस बॅरिकेट्स लावून वाहनधारकांना मार्गदर्शन करत आहे. परिणामी येथील वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 1:21 pm

Web Title: road badly damaged at kasara traffic between nashik and mumbai affected sas 89
Next Stories
1 मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप निर्णय नाही-शरद पवार
2 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत आहेत-शरद पवार
3 स्वतःवर गोळी झाडून घेत SRPF जवानाची आत्महत्या
Just Now!
X