22 January 2020

News Flash

आर्ची-परशासह नागराज मंजुळे झाले ‘सैराट’, ‘मनचिसे’त प्रवेश

नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू व आकाश ठोसर या सैराटमुळे देशभर प्रसिद्ध झालेल्या कलाकारांनी मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

रिंकू राजगुरू, नागराज मंजुळे, आकाश ठोसर

‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचं सभासदत्व स्वीकारलं आहे. नागराज यांच्यासोबतच या चित्रपटातील मुख्य कलाकार म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनीदेखील ‘मनचिसे’चं सभासदत्व स्वीकारलं आहे.

नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू व आकाश ठोसर या सैराटमुळे देशभर प्रसिद्ध झालेल्या कलाकारांनी मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या प्रवेशाचे राजकीय अर्थ काढू नका असं आवाहन मनसेच्या चित्रपट सेनेनं केलं आहे. आमचं काम बघून त्यांनी संघटनेत प्रवेश केलाय असं सांगण्यात आलं आहे.

गेले काही दिवस ही प्रक्रिया सुरू होती आणि आता त्यांनी सदस्यत्व स्वीकारलं आहे. चित्रपट क्षेत्रातल्या अनेक लोकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी मनसेची चित्रपट सेना काम करत असल्याचं बघून या तिघांनी या संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.
मात्र, अनेक पक्षांच्या संघटना असूनही त्यामध्ये या तिघांनी का प्रवेश नाही केला यावर बोलताना  इतर पक्षांत का नाही गेले असा सवाल विचारण्यात येत आहे. मात्र, आमच्या संघटनेचं काम बघून त्यांनी मनसेच्या चित्रपट सेनेत प्रवेश केल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

First Published on September 11, 2018 4:15 pm

Web Title: sairat director nagraj manjule and actors rinku rajguru and akash thosar join mns film workers union
Next Stories
1 ‘आमदार निवास’मध्ये थिरकणार सनी
2 ‘या’ अभिनेत्रीच्या नकारामुळे ऐश्वर्याच्या पदरात पडला उमराव जान
3 ‘स्तनपान म्हणजे आईने बाळाला दिलेली सुंदर भेट’
Just Now!
X