29 September 2020

News Flash

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज ‘संविधान गौरव फेरी’

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी येथे घंटागाडी कामगारांच्या वतीने ‘संविधान गौरव फेरी’ काढण्यात येणार आहे.

| January 26, 2015 01:22 am

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी येथे घंटागाडी कामगारांच्या वतीने ‘संविधान गौरव फेरी’ काढण्यात येणार आहे.
शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी सात वाजता फेरीला सुरुवात होईल. एम.जी. रोड, रविवार कारंजा, पंचवटी, अशोकस्तंभ, आनंदवली, गंगापूर, गोवर्धन, सातपूर, अंबड, पाथर्डी, विहीतगाव, देवळाली गाव, जेलरोड, द्वारका, जिल्हा परिषदमार्गे महापुरुषांना अभिवादन करत राजीव गांधी भवन येथे एक वाजता फेरीचा समारोप होईल. फेरीच्या समारोपास महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांना संविधानाच्या सरनाम्याचे छायाचित्र भेट देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2015 1:22 am

Web Title: samvidhan gaurav rally to prise constitution on republic day
टॅग Republic Day
Next Stories
1 धुळ्यात आज धम्म मेळावा
2 गोवा एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तपासणी
3 नाशिकमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस
Just Now!
X