25 February 2021

News Flash

सांगलीतील प्रेमी युगुलाची महाबळेश्वरमध्ये आत्महत्या

रविवार सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अविनाश हा सांगलीतील एका सहकारी बँकेचा कर्मचारी होता. आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये

पावसाअभावी वाया गेलेली पिके आणि आर्थिक विवंचनेमुळे पाटखळ (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सांगली येथील प्रेमी युगुलाने महाबळेश्वर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. महाबळेश्वर येथील केट्स पाँईंटवर या युगुलाने गळफास घेतला होता. ही घटना आज (दि.१५ एप्रिल) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. अविनाश आनंदा जाधव (वय २८) आणि तेजश्री रमेश नलावडे (दोघेही रा. धुतोंडी, ता. पलूस, जि. सांगली) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांचे नाव आहे. या प्रेमी युगुलाजवळ सुसाईड नोट आढळून आली असून आमच्या आत्महत्येस कोणास जबाबदार धरू नये, असे त्यांनी त्यामध्ये लिहिले आहे. पाचगणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश जाधव आणि तेजश्री नलावडे हे शनिवारी महाबळेश्वर येथे आले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अविनाश हा सांगलीतील मानसिंग सहकारी बँकेचा कर्मचारी होता.

काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये

आम्ही एकमेकांशिवाय सुखी राहिलो नसतो. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नव्हतो. आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आमच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आता वाद करू नयेत. भांडणे केल्यास आमच्या आत्म्यास शांती मिळणार नाही, असे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 3:23 pm

Web Title: sanglis two couple suicide in mahabaleshwar
Next Stories
1 आता पुढचे सुवर्णपदक २०२०च्या ऑलम्पिकमध्ये : तेजस्विनी सावंत
2 औरंगाबादमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्‍यान तरूणाची भोसकून हत्‍या
3 काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील -जयंत पाटील
Just Now!
X