22 October 2020

News Flash

सारस फेस्टिव्हल १५ डिसेंबरपासून

गोंदिया जिल्ह्य़ाची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून आहे.

वन्यप्रेमींचाही सहभाग, पर्यटकही वाढणार
गोंदिया जिल्ह्य़ाची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून आहे. निसर्गसंपन्न गोंदियात पर्यटक नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र राखीव क्षेत्राला भेट देण्यासाठी मोठय़ा संख्येने येतात. जिल्ह्य़ातील माजी मालगुजारी तलावांचा वापर पूर्वी सिंचनासाठी व्हायचा, आता मात्र हे तलाव पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे ते स्थलांतरित व विदेशी पक्ष्यांच्या काही काळाच्या अधिवासामुळे. विशेष म्हणजे, सारस हा दुर्मीळ आणि मोठा पक्षी राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्य़ातच आढळतो. या सारस पक्ष्यांचे संवर्धन करून त्यांची वृद्धी व्हावी व सारस पक्ष्यांना पाहण्यासाठी जिल्’ाात मोठय़ा प्रमाणात पर्यटक यावेत, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून यावर्षी १५ डिसेंबर २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीत सारस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पक्षी मित्र, वन्यजीव छायाचित्रकार व पर्यटक सारस बघायला जिल्’ाात येणार आहेत.
या महोत्सवाचे औचित्य साधून हौशी व वन्यजीव छायाचित्रकारांसाठी नवेगाव-नागझिरा ‘फोटोशुट’ स्पध्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पध्रेत देशातील नामवंत छायाचित्रकारही येणार आहेत. या दरम्यान सारस बचावासाठी प्रयत्न करणारे शेतकरी सारसमित्र पुरस्काराने सन्मानित केले जातील. गोंदियातील अनेक शाळांमध्ये सारस चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरील इमारतीच्या िभती, उड्डाणपुलाच्या िभती व बिरसी विमानतळापासून परसवाडाकडे जाणाऱ्या विमानतळाच्या सुरक्षा िभतीवर सारस चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार असून याच मार्गावर सायकल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक व शहरातील मुख्य ठिकाणी सारस फेस्टिव्हलच्या आयोजनाबाबतचे बॅनर्स लावण्यात येणार आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथील पत्रकारांचा मुक्काम असलेल्या सुयोग या निवासस्थानाला पालकमंत्री राजकुमार बडोले भेट देणार असून या पत्रकारांना गोंदिया येथील सारस फेस्टिव्हल व सारस पक्षी बघायला येण्याचे निमंत्रण देणार आहेत.
सारस पक्ष्यांचा मोठय़ा प्रमाणात वावर असलेल्या परसवाडा, झिलमिली व घाटटेमनी येथील ग्रामस्थांना या फेस्टिव्हलमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना सारस संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली या फेस्टिव्हलच्या आयोजनाबाबत ५ डिसेंबरला वन्यजीवप्रेमी, अधिकारी, हॉटेल व्यवस्थापन, ट्रॅव्हल एजन्सी, बिरसी विमानतळ व्यवस्थापन, वन्यजीव फोटोग्राफर यांच्यासोबत बठक पार पडली. या बठकीला जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, वन्यजीवप्रेमी डॉ. राजेंद्र जैन, मुकुंद धुर्वे, भारत जसानी, सुनील धोटे, अनिल भागचंदानी, रूपेश िनबात्रे, त्र्यंबक जरोदे, डॉ. विजय ताते, अदानी फाऊंडेशनचे सुबोध सिंग, बिरसी विमानतळ व्यवस्थापनचे प्रजापती, हॉटेल गेट वे चे राजेंद्र वामन, हॉटेल ग्रँड सीताचे धम्रेश पटेल, अंकित पटेल, सोनाली ट्रॅव्हल्सचे महेश गुप्ता उपस्थित होते.

सारस सर्वात मोठा उडणारा पक्षी
सारस महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्य़ातच आढळतो. सारस सर्वात मोठा उडणारा पक्षी आहे. नर आणि मादी ही सारसची जोडी आपल्या जोडीदाराची एकदा निवड केल्यानंतर आयुष्यभर सोबत राहतात. जोडीदारांपकी एकाचा जरी मृत्यू झाला तर त्याच्या विरहाने दुसरा अन्नत्याग करून आपले जीवन संपवतो. जसे इतर पक्षी जंगलात व झाडावर राहतात त्याला मात्र सारस अपवाद आहे. सारस पक्षी माणसांच्या वस्तीजवळच्या तलावांजवळ व धानाच्या शेतात वास्तव्य करतो. सारस कधीच झाडावर बसत नाही. तो घरटे सुद्धा धानाच्या शेतात तयार करतो. तेथेच अंडी घालून पिल्लांना जन्म देतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2015 2:04 am

Web Title: saras festival from 15 december
Next Stories
1 एनटीसीएचा अहवाल ‘हुमन’च्या मुळावर
2 ‘अ’ श्रेणीसाठी कुलगुरूंचा ‘मॉक-नॅक’चा अभिनव प्रयोग
3 अहेरीत हिमालयातील पाणमांजराची जोडी
Just Now!
X