करोना विषाणूचा हाहाकार सध्या जगातील नागरिकांची झोप उडवत आहे. देशात सर्वच यंत्रणा या विषाणूला परतवून लावण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. देशभर टाळेबंदी लागू करण्यात आल्यामुळे आपल्यापैकी बहुतांश लोकांनी घरात स्वत:ला कोंडून घेतले आहे. १५ एप्रिल पर्यंत हीच परिस्थिती कायम राहणार आहे. दिवसाच्या सर्वच वेळेत घरातील तिन्ही पिढय़ा एकत्रित वावरत आहेत. शाळा-महाविद्यालयीन मुले घरात उबगली आहेत. पालक हतबल झाले आहेत आणि वृद्धांना हिंडण्या-फिरण्यावर बंधन आल्यामुळे त्यांचा जीव घुसमटत आहे. या उदासीन आणि भयप्रवण वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कुणी शोधून काढले असतील, वाचनापासून छंदांच्या काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि आनंदी बनविला असेल, तर मग पाठवा लिहून या अशा सकारात्मक कहाण्या इतरांनाही कळाव्यात यासाठी. त्यांतील निवडक अनुभवांना ‘लोकसत्ता’तून प्रसिद्धी देण्यात येईल. कमाल शब्दमर्यादा ५००. सोबत काही छायाचित्रे असली तर उत्तम. आमचा

ईमेल :  coronafight@expressindia.com