केवळ पती-पत्नी हा परिवार होऊ शकत नाही, तर आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा अशा सर्वाचा मिळून परिवार बनतो. परिवाररूपी कुटुंब आज संपुष्टात आले असून, विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहे. मात्र, त्यामुळे समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे महामंत्री राजकुमार भुतडा यांनी केले.
जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित समाजप्रबोधन व स्नेहमिलन सोहळय़ात ते बोलत होते. माहेश्वरी सभेचे दक्षिणांचलचे प्रदेश उपाध्यक्ष रामनिवास जेथलिया अध्यक्षस्थानी होते. महासभेचे दक्षिणांचलचे संयुक्त मंत्री देवकीनंदन सारडा, पुष्पाताई तोष्णीवाल, रामनारायण काबरा, श्रीकिशन भन्साळी, राधेश्याम चांडक, हरिकिशन मालू, गोवर्धनदास भंडारी, प्रा. गोपाळ बाहेती आदींची उपस्थिती होती.
एकत्रित कुटुंब पद्धतीतच मुलांवर योग्य संस्कार होतात, साधु-संतांचा आदर होतो, असे सांगून भुतडा म्हणाले, की आज आपण सारेच पशाच्या मागे लागलो आहोत. प्रत्येकाला पसा हवा आहे. मुला-मुलींच्या विवाहात लाखो रुपये खर्च केले जातात. सख्ख्या भावाच्या मुलीच्या विवाहास मात्र पाच-पन्नास हजारांची मदत केली जात नाही. जेवणावळीत पशांची उधळपट्टी केली जाते, हे सगळे आता थांबले पाहिजे. माहेश्वरी समाजाने स्वतला आचारसंहिता लागू करावी, असे आवाहन त्यांनी केले.
बिरला मेमोरियल व्यापार सहयोग केंद्राचे महामंत्री कस्तुरचंद बाहेती, माहेश्वरी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अनिता मालू, संयोजक डॉ. हरिप्रसाद सोमाणी, माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष हरिकिशन मालू यांची भाषणे झाली. सूर्यप्रकाश धूत यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पुरुषोत्तम दरक व डॉ. लीला कर्वा यांनी सूत्रसंचालन केले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजात समस्या वाढल्या’
परिवाररूपी कुटुंब आज संपुष्टात आले असून, विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहे. मात्र, त्यामुळे समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
First published on: 14-01-2015 at 01:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Separate family system community problem increase