News Flash

शबाना आझमी यांच्या कारचालकावर गुन्हा दाखल

या अपघातात शबाना आझमी जखमी झाल्या आहेत

शबाना आझमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. एका ट्रकला शबाना आझमी यांची कार मागून धडकली आणि हा अपघात घडला. मात्र या प्रकरणी ट्रकचालकाने खालापूर येथे कारचालक अमलेश कामतविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रायगड पोलिसांनी कारचालकाविरोधात कलम २७९ आणि ३३७ आणि मोटार वाहन अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

‘शबाना आझमी यांचा कारचालक वेगाने गाडी चालवत होता. त्यामुळे त्याच्या गाडीची ट्रकला धडक बसली. यामध्ये त्याचा बेजबाबदारपणा होता’, असं ट्रक चालकाचं म्हणणं आहे.

शबाना आझमी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करत असताना खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये त्या आणि कारचालक जखमी झाले. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शबाना आझमी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 12:40 pm

Web Title: shabana azmi accident truck driver fir rash driving pune mumbai expressway ssj 93
Next Stories
1 Video: ‘तुला लाज वाटली पाहिजे’; टिक टॉक व्हिडीओ केल्यामुळे दीपिका ट्रोल
2 लुकलूकते काही..
3 ट्राय..ट्राय..पण फायदा कुठाय?
Just Now!
X