करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शरद पवार यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे. एवढंच नाही तर कळवण तालुक्यातील शेतकरी मेळावाही रद्द करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये करोनचे चार संशयित आढळले होते. त्यांची तपासणी निगेटीव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि चांदवड या तालुक्यांमध्ये हा दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र गर्दी टाळण्यासाठी हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात करोना व्हायरसचे चार संशयित सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला आहे.करोनाची लागण झालेल्या रुग्णांची देशातली संख्या ४० च्या वर पोहचली आहे. शिंक येणे, खोकला येणे यातून करोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शेतकरी मेळावा म्हटलं की तिथे गर्दी होणं हे स्वाभाविकच. त्यातही त्या मेळाव्यात शरद पवार येणार असतील तर गर्दी होणारच हे सगळं टाळण्यासाठी शरद पवार यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.