अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यावर बुधवारी नाशिकमध्ये टवाळखोरांकडून दगड फेकण्यात आला. यामध्ये तिला किरकोळ दुखापत झाली. नाशिकमधील एका महाविद्यालयात आगामी मराठी चित्रपट ‘बाजी’च्या प्रमोशनवेळी ही घटना घडली. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अमृता खानविलकर या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी महाविद्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी तिथे जमलेल्या काही टवाळखोरांनी फेकलेला दगड अमृता खानविलकरच्या कानाला लागला. त्यामध्ये तिला किरकोळ दुखापत झाली. यासंदर्भात अमृता खानविलकरकडून पोलीसात तक्रार देण्यात आलेली नसल्याचे समजते.