मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ७ हजार १८८ करोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत.त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार २१७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या म्हणजेच रिकव्हरी रेट ५५.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान आज राज्यात ८ हजार ३६९ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात २४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला मृत्यू दर ३.७५ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार ६४४ चाचण्यांपैकी ३ लाख २७ हजार ३१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४५ हजार ७७ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ३२ हजार २३६ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

मुंबई – २३ हजार ७०४
ठाणे- ३६ हजार २१९
रागड ५ हजार ३५७
पुणे- ३६ हजार ८१०
कोल्हापूर- १ हजार ४०१
नाशिक- ४ हजार २२१
औरंगाबाद- ४ हजार ३७०
नागपूर १ हजार १४५