मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या (बुधवार, २९ जुलै) जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे.
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या (बुधवार) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in वर उपलब्ध होणार आहे.
दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?
यंदा एकूण १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहवीची परीक्षा दिली होती. यामध्ये विद्यार्थी – ९ लाख ७५ हजार ८९४, विद्यार्थिनी – ७ लाख ८९ हजार ८९४, तृतीयपंथी विद्यार्थी – ११०, अपंग विद्यार्थी – ९ हजार ४५ यांचा समावेश आहे. तर, संवेदनशील केंद्रांची संख्या ८० होती.
विभागनिहाय विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे –
पुणे : २ लाख ८५ हजार ६४२ विद्यार्थी, नागपूर : १ लाख ८४ हजार ७९५ विद्यार्थी, औरंगाबाद : २ लाख १ हजार ५७२ विद्यार्थी, मुंबई : ३ लाख ९१ हजार ९९१ विद्यार्थी, कोल्हापूर : १ लाख ४३ हजार ५२४ विद्यार्थी, अमरावती : १ लाख ८८ हजार ७४ विद्यार्थी, नाशिक : २ लाख १६ हजार ३७५ विद्यार्थी, लातूर : १ लाख १८ हजार २८८ विद्यार्थी, कोकण : ३५ हजार ६३७ विद्यार्थी.
दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 3:58 pm